प्रयास ला आदर्श मुळे दिसली सृष्टी

33

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.7जुलै):- येथील सहयाद्री रुग्णालयात पाच महिन्याच्या प्रयास भोसले या चिमुकल्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली व आता तो हे जग पाहु शकणार आहे.प्रयास चे वडील खाजगी कंपनीत कार्यरत होते पंरतू कोरोना मुळे त्यांची नोकरी गेली व अशात डॉक्टरांनी प्रयासच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. स्वतःकडील संसारासाठी पोट मारून बचत करुन ठेवलेल्या पैश्यांतुन ऑपरेशन पुर्ण करण्याचा निर्णय आई – वडीलांनी घेतला.दरम्यान या विषयी आदर्श प्रतिष्ठानला पेशन्टच्या नातेवाईक शिवसेनेच्या दौंड शहरप्रमुख सोनोने ताईंनी *आदर्श प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक तथा अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटरचे प्रमुख राहुल ढवाण* यांना माहिती देऊन मदत मागितली.

त्यानुसार संस्थेचे विश्वस्त रणजित ढवाण, अॅड. खंडागळे ( विश्वस्त ) , प्रदीप उदागे (विश्वस्त ) यांनी प्रयत्न करून रु. ५४ हजार रक्कम हॉस्पीटल मध्ये जमा करून भोसले कुंटुबाला आधार देऊन प्रयासच्या शस्त्रक्रियेला मदत केली. यावेळी माझ्या प्रयास ला आदर्श मुळे सृष्टी दिसण्यास मदत झालीय अशी कृतज्ञता प्रयासच्या वडीलांनी व्यक्त केली व समाजातील गरजूंना मदत करण्याचे पुण्यकार्य करीत असल्याचे समाधान व्यक्त केले.

अॅड. खंडागळे म्हणाले की, आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील कोणत्याही गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी आम्ही अहोरात्र मदत करू. तसेच गरजू कुंटुबातील मुला – मुलीच्या उच्च शिक्षणासाठीही आम्ही मदत करीत आहोत.ग्रामीण भागातील गरीब कुंटुबाचे सक्षमीकरण करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती विश्वस्त रणजित ढवाण यांनी पत्रकांराशी बोलताना दिली.