गेवराई पंचायत समितीची मासिक सभेत राष्ट्रवादीचे गटनेते परमेश्वर खरात यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

24
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.7जुलै):-पंचायत समितीच्या मासिक सभेचे झुम ॲप द्वारे आयोजित करण्यात आले होते या सभेत पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे गटनेते परमेश्वर खरात यांनी विविध प्रश्नावर आक्रमकपणे आपली भूमिका मांडत पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे काढले आयोजित बैठकीत गटनेते परमेश्वर खरात हे आक्रमक होऊन त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली गेवराई पंचायत समितीच्या मासिक सभा करण्याच्या पार्श्वभूमीवर झूम ॲप द्वारे नुकतीच संपन्न झाली.

गटनेते परमेश्वर खरात यांनी झूम ॲप द्वारे झालेल्या बैठकीत बोलताना म्हटले की गेवराई तालुक्यातील घरकुल योजननेत लाभार्थ्यांचे घरकुल एक दोन वर्षे उलटूनही त्यांना फक्त एकच हप्ता देण्यात आला आहे त्या लाभार्थ्यांनी व्याजाचे पैसे काढून घराचे बांधकाम पूर्ण केले आहे त्यांना हप्ता न मिळाल्याने त्या लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे असा आरोप केला यासंदर्भात घरकुल विभागाचे अधिकारी यांना प्रश्न केला असता बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली नाही तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सुरू असलेली कामे आणि मनरेगा योजना संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले मनरेगा मधील शेतकऱ्यांनाशेततळ्याच्या कामाची मागणी देऊनही मास्टर निघत नाहीत शेतकऱ्याचे अडवणूक केले जात आहे तसेच गेवराईतील बंगाल पिंपळगाव रोड वरील वडगाव चिखली येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे.
आतापर्यंत गुत्तेदाराणी पुलाचे काम पूर्ण केले नाही तयार केलेल्या साईड पुल दोन वेळेस वाहून गेले त्यामुळे15ते16 गावाचा संपर्क तुटला होता या रखडलेल्या कामामुळे त्यांना नागरिकांचे हाल होत आहेत तरी त्या पुलाचा बांधकामाचा प्रश्न तात्काळ संबंधित गुत्तेदारास सुचना देऊन पूर्ण करा असे अभियंता मोरे यांना सुचवले आहे तसेच तालुका कृषी अधिकारी हे पंचायत समिती मासिक सभेस हजाराहून अद्याप पर्यंत कृषी विभागाचा आढावा देत नाहीत व कृषी विभागांच्या योजनांची माहिती देत नाहीत तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कदम हे पंचायत समिती सभागृहत करोना काळातील कसली माहिती आतापर्यंत दिलेली नाही तसेच ते बैठकीत हजर राहत नाहीत याबाबत पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांनी आक्रमक भूमिका मांडत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने झूम ॲप द्वारे झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले बैठकीत गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप सह आदी अधिकारी व सदस्य सहभागी होते