भारत सरकारच्या नासिक रोड करन्सी नोट प्रेस मधून हाय प्रोफाईल सुरक्षा असून देखील लाखो नोटा गायबपंप

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.13जुलै):- नाशिक रोड करन्सी नोट प्रेस मधून तब्बल लाखो रुपयांचा नोटा गायब झाल्याची खळबळ जनक वार्ता आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत या असलेल्या नोट प्रेस मधून पाच लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था प्रेस मध्ये असते, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचशे रुपयाची दहा बंडल गायब आहेत. प्रेस व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली असून नोटांची शोधाशोध सुरू आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा सह अन्य बाबी पडताळून पाहिली जात असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी प्रेस व्यवस्थापनासह इतर कोणी माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अन्य बाबी उघडकीस येण्याची स्पष्ट होणार आहे. या घटनेने नोट प्रेस करन्सी मध्ये खळबळ उडाली आहे. गहाळ झालेल्या नोटा बाबत काही दिवसापासून गोपनीय रित्या चौकशी चालू होती. प्रेस प्रशासकीय अधिकारी उपनगर पोलिस ठाण्यात पोहोचले असता त्या वेळेस ही घटना उघडकीस आली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता