पुरोगामी पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18जुलै):-शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हा आढावा आज मोठया उत्साहात संपन्न झाली.
पूर्व विदर्भ कायदेशीर सल्लागार ऍड.राजेश सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक इंडिया दस्तक न्यूज कार्यालयात संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पूर्व विदर्भ संघटक निलेश ठाकरे, जिल्हा संपर्क प्रमुख तथा प्रभारी सुजय वाघमारे, संघाचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संघ वाढीसाठी पाहुण्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

“तालुका तिथे पुरोगामी” ही संकल्पना रुजू करण्यासाठी नरेंद्र सोनारकर यांनी “तालुका स्थरावर पुरोगामी चे स्वागत बोर्ड लावण्याचे तालुका अध्यक्षांना आवाहन केले. तर निलेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी नियमित सुसंवाद साधण्याचे आवाहन केले.

तर जिल्ह्याध्यक्ष निमसरकार यांनी विदर्भात पुरोगामी पत्रकार संघाचा चंद्रपूर जिल्हा गढ असल्याचे सांगत सर्वपदाधिकाऱ्यांचे आभार मानले, जिल्हा प्रभारी वाघमारे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या, तर अध्यक्षीय भाषणात ऍड.राजेश सिंग यांनी कोणत्याही पदाधिकारी किंवा सदस्यांना कार्यदेविषयीक अडचण आल्यास त्यांनी निसंकोच व्यक्त होण्याचे आवाहन केले.
आजच्या आढावा बैठकीत सिंदेवाही, गोंडपीपरी, जिवती, भद्रावती,चंद्रपूर,बल्लारपुर, तालुक्याचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आक्रोश खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन विकास दुपारे यांनी केले.