पुरातन काळातील मौलाली दर्गा मोजतंय शेवटच्या घटका – 350 वर्षापूर्वी दर्गाची स्थापना

35

🔹पर्यटनाच्या माध्यमातून दर्जा देण्याची मागणी

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.18जुलै):-येथील मुख्य गावांमध्ये मौलाली दर्गा ची स्थापना करण्यात आली या दर्गा ची स्थापना सूफी संत महबुब सुभानी यांनी 350 वर्षाखालील केली असल्याची माहिती गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात .या मौलाली दर्गा ची आख्यायिका मोठी आहे व या देवस्थान म्हणून तब्बल महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात प्रचलित आहे .महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र प्रदेश व इतर ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे पुरातन दर्गा येथे पाण्याची एक गोडीविहीर आहे या विहिरीला सदा पाणी पिण्यासाठी आहे .हे पाणी दुष्काळातही 1972 मध्ये पडला दुष्काळातही पाणी आटले नाही अशी या गावातील नागरिक सांगितले.

मौलाली दर्गा चीआवसता अत्यंत खराब दुरवस्था झाली असून सध्या या दर्गा कडे ग्रामपंचायत दुर्लक्ष होत आहे.
परिसरातील जागेचे विकास काम हाती घेऊन या दर्ग्याला तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा यासाठी लाखो भाविकांनी मागणी होत आहे .नायगाव तालुक्यातील कुंटूर हे एक मुख्य व जिल्हा परिषद सर्कल चे गाव आहे ,पूर्वी हे गाव मेटुर या नावाने ओळखले जात होते. त्यानंतर एक सुफी संत येथे येऊन मौलाली दर्गा या दर्ग्याची स्थापना केली व आजपर्यंत या दर्ग्याची पुजारी सर्व जाती धर्माचे लोक असून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणित देवस्थान मानले जाते .दगडाने बांधलेले त्याचबरोबर शिल्पकला मंदिर ही शेवटची घटका मोजत आहे .

सर्वच लोकांच्या नवसाला पावणारा मौलाली असा या देवाची ख्याती असून आंध्र प्रदेशातून भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. दोन्ही बाजूला वाघाचे चित्र व शिल्पकला असून समोर घोडा अश्व याचे शिल्प उभारले आहे पुराणिक महत्त्व मोठे असून तीनशे पन्नास वर्षाच्या या देवस्थानाची आज अत्यंत दुरवस्था झाली असून मंदिराच्या आवारात पाणी पाझरत असून पावसाळ्यात व सर्वत्र नागरिकांना बसण्याची सोय नाही दर शुक्रवारी व मंगळवारी येथे कंदुरी म्हणून नवस करतात चांदी सोने अर्पण करतात मोहरम ताजिया च्या वर्षी येथे पाच दिवस यात्रा भरली जाते व नवस फेडण्यासाठी लाखो भाविक येथे येतात .त्या भाविकांना नवसाचा पेढे, गुड,खोबरे कंदुरी करून पाच दिवस धार्मिक विविध कार्यक्रम मोहरम ताजिया त्या दिवसापासून पाच दिवस चालतात .गावभर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोहरम ताजिया सन साजरा करतात. गेल्या कित्येक वर्षापासून या मुस्लीम देवस्थानचा हिंदू पुजारी आहे .व आजही प्रचलित याच पुजाऱ्याचे वंशज यापुढेही पूजा करत आहे .

त्याप्रमाणे येथे हिंदु धर्माचे भाग्यस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मौलाली दर्गा याची प्रचिती तीनशे पन्नास वर्षापासून असूनही याकडे स्थानिक स्थानिक प्रतिनिधी त्याचबरोबर आमदार खासदार गावातील सरपंच मुख्य लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केल्याने या मंदिराची दुरवस्था झाली आहे .या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्या मंदिराची उभारणी करून येथे भाविकांना एक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या अशी सोय करावी याची मागणी परीसरातील भाविक भक्तांनी केली आहे.