कुंटूर परिसरातील सात गावा मध्ये स्मशान भूमीची नोंदच नाही- मेल्यानंतरही सोसावे लागतात यातना

36

✒️चांदू आंबटवाड(नायगाव तालुका प्रतिनिधी)मो.9307896949

कुंटूर(दि.18जुलै):-नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मध्ये मातब्बर नेते मंडळी खासदार -आमदार होऊन गेले मात्र ग्रामीण भागाचा विकासाच्या पायाभूत सुविधा आजही ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या नाहीत याचे दुःख खंत व्यक्त करीत आहेत. कुंटुर परिसरासह एकूण सात गाव मध्ये समशान भूमी ची गायरान असो या पारंपारिक जमिनीची नोंद ही नसून विविध ठिकाणी व नदीच्या कडेला रस्त्याच्या कडेला अंत्य संस्कार करावे लागतात.माणुस मेल्यानंतरही माणसाच्या यातना संपत नाही त्यांना नरक यातना सोसाव्या लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. गुडघाभर चिखल झाडी झुडपे वाढलेल्या समशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत असे. स्मशान भूमी ची कागदावर नोंदकरुन लाखों रुपये चा नीधी वितरण केल्याचे सांगितले जाते.

प्रत्येक्ष जागेवर चिखल, झाडी झुडपे, गवत,दगड असं धड रस्ता नाही, पाणी सोय नाही आस चित्र प्रत्यक्ष दिसून येत आहे. मात्र ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सदर गावातील स्मशानभूमीची जागा नोंद घेत नाहीत.

त्यामुळे ग्रामपंचायतला नोंद घेऊन व ग्रामीण भागातील 8 नंबरला नोंद करून सोयी सुविधा पुरवून तेथे तीन शेड बांधून अशी सोय करण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षापासून होती मात्र ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असो या प्रशासन कोणीही लक्ष देत नाही यामुळे आजही ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील स्मशानभूमीची नोंद करुन सोईसुविधा पुरवठा करावा अशी नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.


“मेळगाव,सांगवी, धनंज हि गावे आजही स्मशानभूमी पासून दूर आहे. सदर येथील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी थेट नदिला तीन किलोमीटर अंतरावर कडेला अंत्यसंस्कार करावं लागतं आहे शासनाने स्मशानभूमीची नोंद करुन सोई सुविधा पुरवठा करावा- प्रकाश महिपाळे सामाजिक कार्यकर्ते मेळगाव”

” लवकरच ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीची सोईसुविधा देण्यात येणार आहे. प्रेत जाळी,सिसि रस्ता, पाणी पु
फरवठा सोय करण्यात येणार आहे- कुंटुर येथील ग्रामपंचायत सदस्य नागोराव भोसले”