विद्युत तारांच्या शॉक लागून यशवंतराव प्रभाकर कोळी यांच्या मृत्यू

24

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.21जुलै):- शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ काम करत असताना शॉक लागून एका . इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे विद्युत तारांचे खाजगी कंन्टेक्शन घेऊन काम करणाऱ्या इसमाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील मजूर विद्युत पोलाचे काम करत असताना मजूर ठेकेदार शॉक लागून मृत्यू झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील अजदे शिवारात विद्युत तारांचे व पोलांचे काम करत असताना खाजगी कंट्रक्शन कामगार यशवंत (आण्णा) प्रभाकर कोळी राहणार घोळगाव वय 39 यांच्या मृत्यू झाला आहे नेमका शॉक कशामुळे लागला अजून कळले नाही मात्र त्यांच्या मुलगा भूपेन्द्र यशवंत कोळी हा तिथे असताना हा अपघात घडताना पाहिले आहे.भूपेंद्र च्या म्हणण्या नुसार विद्युत बंद केली होती मग काम चालू केले तरी देखील शाॅक कसा लागला विद्युत बंद केली होती हा अपघात कसा घडला त्यांचे म्हनणे आहे मृत्यूदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे