चार्वाक वनात आषाढी पौर्णिमेनिमित्त धम्मसंगितीचा कार्यक्रम संपन्न

38

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23जुलै):-‘ बोधि प्राप्तीसाठी बोधीसत्वाला दस बल प्राप्त करावे लागतात. विमला हे बल ,बोधिसत्व जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत प्राप्त करतो.आता बोधिसत्व काम चेतनेपासून मुकत असतो आणि त्याची कोणत्याही प्रकारची तृष्णा शिल्लक राहिलेली नसते. सर्व प्राणीमात्रासंबधी त्याचे मन करूणामय होते .बोधिसत्व कोणाच्या दुर्गुणाला प्रोत्साहन देत नाही आणि कोणाच्या सद्गुणाला नाउमेद करीत नाही.’ अशी विमला बल प्राप्तीनतरची बोधिसत्वाच्या चित्ताची अवस्था असते, असे मत आषाढी पौर्णिमा धम्मासंगितीत व्यक्त झाले आहे.आषाढी पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन दि.२३जुलै २०२१ रोजी सकाळी ९ वाजता चार्वाकवनात करण्यात आले होते.

धम्मसंगितीचे अध्यक्षपदी से. नि. मुख्याध्यापक उपा.सुधाकरराव बनसोड सर होते.’ विमला बल’ या विषयावरील चर्चेपुर्वी बुद्ध मूर्तीपुढे वंदना झाली आणि तुकाराम चौरे सर यांनी बौद्धधम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले .

या चर्चेत सर्व उपा. टी. बी. कानिंदे, एम एल. धुळध्वज, डि.जी.पाईकराव ,गोवर्धन मोहिते,पी.बी.भगत.जी.एम.कांबळे,भीमराव भवरे यांनी भाग घेतला. धम्मसंगितीत के.व्ही.मुनेश्वर, प्रल्हाद खडसे, नारायणराव क-हाळे,भीमराव खडसे.यशवांत कांबळे,सुधाकर भगत,ल.पु.कांबळे,अभिषेक देवरे,उत्तमलाल रामधनी,सुभाष दायमा, प्रदीप तायडे, विश्वजीत भगत उपस्थित होते.

अध्यक्ष उपा. सुधाकरराव बनसोड यांनी समारोप करून पुढील धम्मसंगति २२ आगष्ट २०२१रोजी भरेल असे सांगितले .उपा.असोले यांनी उपस्थिताचे आभार मानले व संगितीची सांगता झाली.