जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला सी.एस.सी. सेंटर चालकांकडून केराची टोपली

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24जुलै):-सद्यस्थितीत कोरोना महामारी ची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी राजा अगोदरच परेशान व त्यात गंगाखेड शहरांमध्ये सी.एस.सी. सेंटर व महा ई सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्याकडून आर्थिक लूट व उद्धट बोलणे सहन करावा लागत आहे.आज दिनांक 23जुलै रोजी नायब तहसीलदार मा.घोंगडे साहेबांना निवेदन देण्यात आले.गंगाखेड शहरामध्ये व परभणी जिल्ह्यामध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने थैमान घालून शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचे सावट असताना व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सर्व सीएससी सेंटरला व महा ई सेवा केंद्रांना सक्त आदेश असताना पिक विमा भरण्यासाठी सक्तीने पैसे वसुली चालू आहे.

100 ते 150 रुपये विमा भरण्यासाठी जास्तीचे द्यावा लागत आहे ज्या शेतकऱ्याने जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला त्याच साईट चालत नाही तुम्ही नंतर या याचे कारण देऊन उडवाउडवीचे उत्तर देऊन अरेरावीची भाषा करणाऱ्या सीएससी सेंटर वर व महा ई सेवा केंद्रावर विशेषता तहसिल समोरील सि.एस.सी. सेंटर चालक अनिल प्रभाकर लोखंडे यांचे सि.एस.सी .सेंटर गौंडगाव येथील पत्ता असुन ते आपल्या कार्यालयाच्या समोर चालवत आहे व उद्धट बोलणे कोणाचा आदेश मी मानत नाही माझी वरपर्यंत सटींग आहे माझे काहीही होऊ शकत नाही व शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे घेणे बाबत योग्य ती चौकशी करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ कारवाई करून शेतकरी राजाला योग्य न्याय द्यावा अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील नागरिकां तर्फे करण्यात येत आहे.
या निवेदनावर राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली परभणी जिल्हा अध्यक्ष देवराव (बाळासाहेब) जंगले, कटृर शिवसैनिक उद्धवराव भोसले,कसबे,व इतर जन होते.