पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ – पुन्हा आस्मानी संकट

44

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

खटाव(दि.24जुलै):-संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर, या जिल्ह्यात नद्यांना महापूर आले आहेत महाबळेश्वर मध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 142 मी. मीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर, प्रतापगड पुणे ,भोर रस्ते वाहून गेल्याने सातारा सांगली कोल्हापूर पुणे भागातील प्रवाशांनी प्रवास करणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आव्हान प्रशासनाद्वारे करण्यात आले असून आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

*एनडीआरएफच्या टीम दाखल*.

राज्यात एकूण 14 टीम पैकी चार पश्चिम महाराष्ट्रात.

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन व कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे सातारा एक सांगली एक तर कोल्हापूर 2 टीम प्रत्येक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.
पाटण शहर पाण्याखाली
कोयना धरण लगत असलेली पाटण शहरांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्र पाणी गेले आहे जुना निसरे पुल पाण्याखाली गेला आहे.

 

*पालकमंत्र्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा*

गेले दोन तीन दिवस झाले सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून कोयनानगर महाबळेश्वर येथे विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य नद्या कृष्णा कोयना महापूर आला असून सांगली येथील कृष्णा नदी धोक्याच्या पातळी जवळ आली आहे.

*कोल्हापूर मधील पंचगंगा नदी ला महापूर पुणे ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्ग बंद*

कोल्हापूर मधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून 2019 पेक्षाही पाणी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याची विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे