नव युवकाच्या वतीने कन्हाळगाव येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार

25

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कन्हाळगाव(दि.24जुलै):-ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे व नव युवकांनी उपसरपंच नारायण हिवरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेडमाके,सौ मीराताई ढासले सदस्य,सौ सरिताताई केराम सदस्य,सौ नंदाताई मोहुर्ले यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण पा नवले,श्री नारायण हिवरकर सत्कार मूर्ती उपसरपंच,श्री आनंदराव शेडमाके सत्कारमूर्ती ग्रामपंचायत सदस्य, मिराताई ढासले ग्रामपंचायत सदस्य,सौ सरिता ताई केराम ग्रामपंचायत सदस्य,सौ नंदाताई मोहुर्ले ग्रामपंचायत सदस्य,प्रमुख पाहुणे संबा पाटील पेचे, श्री आनंदराव पाटील मालेकर, श्री दादाजी पा टेकाम,श्री शामभाऊ मालेकर, श्री दिपक गारघाटे,श्री नामदेव खनके,श्री प्रकाश पा ढासले, गुणवंतजी बुरडकर,आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर उपसरपंच यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे खूप खूप आभार मानले मला पाच वेळा संधी दिली व निवडून सुद्धा दिले कन्हाळगाव ग्राम वासियांचे मी सात जन्म उपकार विसरणार नाही या नंतर सुद्धा कन्हाळगाव च्या विकासासाठी तत्परतेने काम करत राहु असे मनोगत व्यक्त केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य बालु देवयीकर, संदीप भोयर, हरिभाऊ मालेकर, विलास पावडे,अमोल सोयाम,विजय आपटे,डाखरे,राजेंद्र पावडे आदि अनेक नवयुवक, गावातील नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री शामभाऊ मालेकर यांनी केले तर आभार दिनकर पेचे यांनी मानले