आष्टी येथील बी.फार्मसी कॉलेजचा ९४ टक्के निकाल

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26जुलै):- येथील आनंद चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेन धोंडे साहेब यांच्या प्रयत्नातून आष्टी व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फार्मसी (औषध निर्माण शास्त्र) या व्यवसायिक शिक्षणाची सुरुवात २००६ साली कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) या नावाने आष्टी येथे सुरुवात केली.या संस्थेमधून अनेक विद्यार्थ्यांनी आपले फार्मसी क्षेत्रांमध्ये करिअर घडवले आहे.तसेच मा.आ.भीमसेन धोंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी मध्ये उच्च शिक्षण मिळावे म्हणून आष्टी येथे २०१६ पासून कॉलेज ऑफ फार्मसुटिकल सायन्स अँड रिसर्च,आष्टी (पदवी बी.फार्मसी) या कॉलेजची स्थापना केली.

नुकत्याच या बी,फार्मसी कॉलेज चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ऑक्टोबर नोव्हेंबर २०२० या परीक्षेचा प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ वर्षाचा निकाल लागला आहे.त्यामध्ये प्रथम वर्षातील प्रथम सेमिस्टर मध्ये कुमारी मोहळकर अनुपमा विष्णू प्रथम ७८.५२%,कुमारी धोंडे गायत्री अशोक द्वितीय ७७.०४% ,कुमार धोंडे आदित्य किरण तृतीय ७६.४४%,तसेच द्वितीय वर्ष तिसरे सेमिस्टर यामध्ये कुमार विधाते कानिफनाथ पोपट प्रथम ८६.८३%,कुमारी हर्षदा बाळासाहेब कुदळे द्वितीय ८५.६७%,कुमारी लोखंडे अंजली किसन द्वितीय ८५.६७%,कुमारी रेडेकर पायल दिगांबर तृतीय ८५.३३%,त्यानंतर तृतीय वर्ष पाचवे सेमिस्टर कुमारी कर्डिले पूनम काशिनाथ ९१.६९%,कुमारी पवार सुभद्रा संजय द्वितीय ९१.०८%, कुमारी कोल्हे अश्विनी जयंत तृतीय ९०.९२% व चौथे वर्ष सातवे सेमिस्टर मध्ये कुमार अनभुले संदीप बाळू प्रथम ८८%,कुमार सुरवसे दिलीप भगवान द्वितीय ८७.५०%,कुमारी रासकटला वानेश्री श्यामकुमार तृतीय ८७.३३%,या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

प्रथम वर्ष ८७.१२%,द्वितीय वर्ष ९३.४२%, तृतीय वर्ष ९४.०६%,चतुर्थ वर्ष ९८.९६% या प्रमाणे कॉलेजचा सरासरी निकाल ९४% लागला आहे.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेन धोंडे,संचालक अजय( दादा) धोंडे,युवा नेते अभय धोंडे तसेच प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,शिवाजी वनवे,संजय शेंडे यांनी विद्यार्थी,प्राचार्य,सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

या यशामागे कॉलेजमध्ये दररोज होणारे अध्यापन,प्रात्यक्षिके,विविध वैज्ञानिक प्रोजेक्ट,संशोधन,बाहेरील नामवंत शिक्षकांची मार्गदर्शन,सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष तसेच कॉलेजमधील उत्कृष्ट असे ग्रंथालय तसेच सध्याच्या जागतिक महामारी कोविड- १९ या विषाणूमुळे गेल्या वर्षभरापासून कॉलेज बंद आहेत तरी सुद्धा ऑनलाईन माध्यमांचा वापर करून घरी बसून विद्यार्थ्यांना व्हाट्सअप,युट्युब,ई-मेल,झूम,गुगल मीट या मार्फत मार्गदर्शन केले.तसेच अजूनही मार्गदर्शन चालू आहे.या सर्व गोष्टींमुळे कॉलेजचा उत्कृष्ट असा निकाल लागतो असे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे यांनी म्हटले आहे.