पंचशील: मानवी मूल्यांचा आधार” या विषयावर सहा दिवसीय ऑनलाईन वर्कशॉप चे आयोजन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक

ब्रम्हपुरी(दि.27जुलै):- स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे आंबेडकर विचारधारा विभाग, पाली विभाग,सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सहा दिवसीय ऑनलाईन वर्कशॉप चे आयोजन दि.२६ जुलै २०२१ ला करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने “बौद्ध धम्मातील पंचशील:मानवी मूल्यांचा आधार” या विषयाला घेऊन “पानातीपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि” या पहिल्या धम्म शिलावरती भदंत ज्ञानज्योती, तपोवन बुद्ध विहार, भिक्खू संघ संघारामगिरी,ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर यांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. देवेश कांबळे, सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदा (ब्रह्मपुरी) यांनी भूषविले. त्यांनी ह्या वेळेस आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बौद्ध धम्म किती महत्त्वाचा आहे हे मुद्देसुद पटवून दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझिझुल हक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामधून पंचशील तत्वावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुफान अवताडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी सूत्रबद्ध रित्या पार पाडले. आभार प्रदर्शन प्रा. भीमादेवी डांगे, पाली विभाग प्रमुख यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी व महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.