वृक्षारोपण करीत वाढदिवस केला साजरा

26

🔸उदयकुमार सुरेश पगाडे यांनी आज स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षरोपणाचा केला संकल्प

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1ऑगस्ट):- कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वांना समजून आले. भविष्यात अशी परिस्तिथी पून्हा निर्माण नाही व्हावी, यासाठी वृक्षरोपणाचा संकल्प करण्यात आला.

ब्रम्हपुरी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते, उदयकुमार सुरेश पगाडे यांनी आज स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षरोपणाचा संकल्प करीत आय.टी.आय.कॉलेज ब्रम्हपुरीच्या परिसरात अनेक प्रकारच्या वृक्षांचे रोप लावत, आपल्या मित्रपरिवारांशी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

वृक्षारोपण करताना खेड ग्रा.पं.सदस्य अक्षय चहांदे, अरविंद नागोसे, विपुल शेंडे, श्रुती मेश्राम, पुनम कुथे, प्रिया नागोसे, आर्यन नागोसे, पंकज कोलते, पिंटू ठाकरे, निखिल नागोसे, अक्षय आडकीने (फोर स्टार युट्युबर टीम ) आशिक डांगे, विक्रांत मेश्राम, राजू मूळे इत्यादी मित्र परिवार उपसस्थित होते.