माजी आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आॕनलाईन शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन – गणेशशेठ धोंडे

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3ऑगस्ट):-पाटोदा,शिरुर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमसेन धोंडेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या ऑनलाईन शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गणेशशेठ धोंडे,योगेश बोराटे,संदिपशेठ अनारसे यांनी केले आहे.
या स्पर्धेतील निबंधाचे विषय शिक्षणमहर्षी भीमसेन धोंडे यांचे शैक्षणिक कार्य,ऑनलाईन शिक्षण प्रणाली योग्य की अयोग्य ? हे दोन विषय आहेत.

गणेशशेठ धोंडे – ८६०५९७६९२३,योगेश बोराटे – ९६०४३०८८९३ आणि संदिपशेठ अनारसे – ९६५७५८०११० यांच्याकडे निंबंध पाठवावेत.स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १५५५ रू. व सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक ११११रू. व सन्मानपत्र,तृतीय पारितोषिक ५५५रू.व सन्मानपत्र असे स्वरुप आहे.स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे – निबंध कमीत कमी २ पानाचा असावा,निबंध पाठवण्यासाठी अंतिम दि:६ आॕगस्ट २०२१ पर्यंत असेल.स्पर्धा फक्त आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राहील.निबंध सुवाच्च अक्षरात असावा.बक्षीस वितरण स्वातंत्र्य दिन दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन बक्षीस रक्कम व प्रशस्तीपत्र दिले जाईल असे संयोजक गणेशशेठ धोंडे यांनी सांगीतले.