महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-वंचित बहुजन आघाडी

23

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4ऑगस्ट):-महाराष्ट्रात झालेल्या महापुरामध्ये अनेक नागरिक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांचे सरकारतर्फे तातडीने मदत व पुनवर्सन करावे अश्या मागणीच्या आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांना देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पुसद तालुका अध्यक्ष बुध्दरत्न भालेराव,तालुका उपाध्यक्ष प्रकाश खिलारे,जिल्हा संघटक राजकुमार तालिकुटे, पुसद शहर अध्यक्ष शे.मुक्तार शे.निजाम तालुका उपाध्यक्ष दीपक पडमे,शहर महासचिव प्रसाद खंदारे,विपुल भवरे,माधव हाटे,मधुकर सोनवणे,बाबुराव ढगे,श्रीकांत सुरोशे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.