लढ रं मर्दा…

28

भीमा आधी होता तुझा,
गुलामीचा कालखंड..
पुकार आता बंड,
तुझे थोपटूनी दंड..
लढ रं मर्दा लढ आता तू,
लढ रं मर्दा लढ रं ss..!

रक्त तुझे फक्त आहे समाजाच् साठी..
सदा ठेव नांव भीमाचेच् तुझ्या ओठी..
राहिलेल्या मनुला आता,
खोल खोल गाड रं sss..!
लढ रं मर्दा लढ आता तू,
लढ रं मर्दा लढ रं sss..!

मुलीवर अन्याय पाहून, अश्रू ढाळी आई sss
अन् खरंच गोर-गरीबांना,
न्याय मिळत नाही..
थैमान घालत आहे इथे,
जातीवादी गुंड रं sss..!
लढ रं मर्दा लढ आता तू,
लढ रं मर्दा लढ रं sss ..!

ध्यानी ठेव तुझ्या भीम-ज्योतीचे कृती कार्य..
रणी लढतांना समाज पाहील तुझे शौर्य…
घेऊन हाती निळा झेंडा,
गड तू आता चढ रं sss..!
लढ रं मर्दा लढ आता तू,
लढ रं मर्दा लढ रं sss..!

तोडण्या तू निघ आता समाजातील बेकी..
भीमटायगर पंजाब म्हणे,
हीच आहे नेकी..
भावी पिढी वाचविण्या तू,
फर्मान आता काढ रं sss..!
लढ रं मर्दा लढ आता तू,
लढ रं मर्दा लढ रं sss..!

🖋️शब्दांकन:-भीमटायगर पंजाबराव कांबळे,यवतमाळ.9850342588