वंचित बहुजन आघाडीच्या इच्छूक उमेदवाराचे जोरदार बैठका

23

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.१४ऑगस्ट):-देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील सर्पदंश तज्ञ धन्वंतरी रुग्णालयाचे डॉ. उत्तमराव इंगोले यांनी या पोटनिवडणुकीत उडी घेतल्याचे दिसून येत आहे.दि.१३ ऑगस्ट २०२१ रोजी हणेगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन आपण विधानसभा पोटनिवडणूकी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगितले. यावेळी हणेगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडून सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी डॉ. उत्तमकुमार इंगोले यांनी आपल्या भाषणात आपल्या डॉक्टरी पेशेबद्दल बोलताना पेशंटच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल व त्यांच्याकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्लेबद्दल मार्गदर्शन केले व मागील आठवडयात काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व ग्रा.पं. सदस्यांचा मेळावा बोलवून निधीचे वाटप करण्यात आले आहे, परंतू हि पद्धत कोणती आहे. आजपर्यंत अशी योजना राबवण्यात आली नव्हती पण आजच का, यापद्धतीची निधी कुठून आली, सर्व ग्रामपंचायतीच्या नावाने निधी वाटप करण्यात आली, जि.प. अध्यक्षाच्या लेटरपॅडने निधी वाटप करण्यात आले. ही निधी कुणाच्या फंडातून आहे असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थीत करण्यात आले.

हि विधानसभा पोटनिवडणूकीची लढाई म्हणजे अशोकराव विरुद्ध देवेंद्र फडणविस असे असल्यामुळे याला अतिमहत्व येत आहे. अशातच वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवार असल्यामुळे त्यांची आणखीनच डोके दुखी झाली आहे असेही ते म्हणाले. या भागात मी एक डॉक्टर असल्यामुळे या भागातील अडीअडचणी, गोरगरिबांची अडचन, या भागातील विकास कामे, यासगळ्या गोष्टीचा विचार करून मला आमच्या सर्व डॉक्टरांनी आपला पाठींबा दर्शविली असेही सांगीतले.
यावेळी वंचित बहूजन आघाडीचे इच्छूक उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले, मा. मिलींद कर्णे, हणेगाव ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार, पं.स. सदस्य प्रतिनिधी राजकुमार हदिखेरे, डॉ.आनंद चिद्रावार, डॉ. सुर्यकांत नाईक, डॉ. ज्ञानेश्वर शेरीकार, ग्रा.प. सदस्य वसंत आडेकर, संदिप चेलवे किशोर आडेकर, मारोती मोरेवाड, धनाजी होटले आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.