लाचखोर शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांच्या पोलीस कोठडीत सोमवारी पर्यंत वाढ

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.14ऑगस्ट):- तब्बल आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसासाठी पोलीस कोठडी दिली होती आज त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता या कोठडीत वाढ करण्यात आली आहे सोमवार पर्यंत ही कोठडी राहणार आहे मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्यानंतर या दोन दिवसापासून खरं होत्या पण शुक्रवारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह दोन जनावर लाच प्रकरणी कारवाई केली होती.

पण महिला असल्याने सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने लाचलुचपत विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना देराच्या ताब्यात दिले होते पण त्या हजर राहिल्या नाही त्यानंतर न्यायलायात लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने ते फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले पण याप्रकरणी वाहन चालक ज्ञानेश्वर आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते यानंतर विर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यात आता दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे *अशी अडकले सापळ्यात* नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांच्यासह तीन जण आठ लाखाची लाच घेताना मंगळवारी सापळ्यात अडकले ठाणे प्रतिबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य केले या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदान याप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणातील आरोपी पंकज रमेश दसपुते राजेवाडी येथे प्राथमिक शिक्षक यांनी आरोपी वैशाली वीर झनकर यांच्याकरिता नऊ लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर दिनांक 17 जुलाई 21 रोजी याची पडताळणी केली असता सदर कामाकरता आठ लाख रुपये देण्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले सोबत कन्या बाबत सांगितले त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी यांच्याकडून वीर यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडून आठ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले