वाढदिवस निमित्ताने लोखंडी टोकदार तलवार प्रदर्शन- पोलिसांनी घेतली दखल

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.18ऑगस्ट):- दिनांक १२/०८/२०२१ रोजी प्रतिक हनुमानजी ठाकरे वय १९ वर्षे रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचा वाढदिवस असल्याने त्याने रात्री २२.०० ते २३.००वाजता दरम्यान आपले मित्रांसोबत संत गोमाजी वार्ड येथे हातात लोखंडी टोकदार तलवार बाळगुन टेबल वर ठेवलेले केक कापुन सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारख्या घातक शस्त्राचे प्रदर्शन केले व सदरचा व्हिडीयो व्हाॅटसएप सारख्या सोशल मिडीयावर प्रसारीत केला.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशतीचे व भितीचे वातावरण तयार झाल्याने सदरचा व्हिडीयो प्राप्त होताच प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन त्यामधील आरोपी प्रतिक हनुमानजी ठाकरे वय १९ वर्षे संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचा शोध धेवुन त्याचेवर आज रोजी अप. क्रमांक ७१७/२०२१ कलम ४, २५शस्त्र अधिनियम अन्वये कार्यवाही करून आरोपी अटक करण्यात आली. पुढील तपास नापोकाॅ सुहास चांदोरे हे करीत आहेत.सदरची कारवाई विवेक बनसोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे , उमेश बेले यांनी केली