_अंकुर स्वयंसेवी संस्था केज व पुरोगामी संदेश टीम यांच्या वतीने स्त्रीयांच्या हक्क अधिकाराच्या जणजागृतीसाठी राबविण्यात येणार मोहिम

34

🔹लोकशाही उत्सव समितीतर्फे स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कांसाठी मोहिम

🔸या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा- अनिता कांबळे

✒️नवनाथ पौळ(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.21ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्ताने लोकशाही उत्सव समितीच्या वतीने स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कासंदर्भात मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील विविध संस्था-संघटना व व्यक्ती या मोहिमेत सहभागी होणार असून, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भावांनी बहिणींचा संपत्तीचा हक्क मान्य करावा व त्यासाठी कायदेशीर पाऊल उचलावे, यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असण्यासाठी संपत्तीवरचा हक्क महत्त्वाचा ठरतोच, शिवाय व्यक्तीने शोषण, हिंसाचार, भेदभावाला विरोध करण्यासाठीही तो मदतकारक ठरू शकतो.

स्त्रियांच्या नावावर अतिशय कमी संपत्ती आहे आणि त्यापैकी त्यांच्या नियंत्रणात असलेली संपत्ती आणखीनच कमी आहे. स्त्रियांचा जन्मघरच्या आणि वैवाहिक, अशा दोन्ही ठिकाणच्या संपत्तीचा हक्क डावलला जातो. हे चित्र बदलावे यासाठीची ही मोहीम पुढे वर्षभर सुरू राहणार आहे.या मोहिमेत सक्रीय सहभागी व्हावे आणि बदलाचे पाऊल उचलावे, असे आवाहन अंकुरटिमने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात केले आहे.

सदरील कार्यक्रमासाठी चे मेहनत ही
प्रा. जया सागडे, प्रसन्ना इनवल्ली, सुनीती सु.र., मिलिंद चव्हाण, सीमा काकडे, योगेश हुपरीकर, अलका पावनगडकर, शंकर गवळी (पुणे), शहाजी गडहिरे, प्रवीण सूर्यगंध (सांगोला), संगीता सराफ (नवी मुंबई) राधाकृष्ण देशमुख, विकास बिरादार (लातूर), अनिता कांबळे (केज), जया नलगे, मीना शेंडकर (पुरंदर), संतोष कांबळे (लांजा), कल्याणी अनिता मनोहर (नाशिक), विवेक जाधव (संगमनेर), शीतल शिंदे (विटा) कमलेश जाधव (भिवंडी) व इतर कार्यकर्ते घेत आहेत.
मोहिमेविषयी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनसुद्धा केले आहे .

(मिलिंद 9890025565), (सीमा 9890568577), (योगेश- 8600212524),(शंकर 95521 67702), ( कमलेश 9922798966), (अनिता कांंबळे मो.9922519974)(लक्ष्मण हजारे मो 9082792522)