सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या फेरीवाल्याला कठोर शिक्षा करा- शिवानंद पांचाळ नायगांवकर

105

🔸सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना निवेदन

✒️नायगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगाव(दि.3सप्टेंबर):- ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव या मुजोर फेरीवाल्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी करून त्यांच्या हाताची दोन बोटे तोडली. त्यांच्या डोक्याला ही लागले आहे, यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सोमनाथ पालवे अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याचांही हाताची बोटे तुटले आहे, अशा मगरूर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर जिल्हाधिकार्‍यासह पोलीस अधीक्षकांना तहसीलदारांमार्फत लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाची माहिती स्तव‌ प्रत नायगांव ( बा ) पोलीस स्टेशन ला देण्यात आली, निवेदनात म्हटले आहे की, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत असतांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता अमरजित यादव मुजोर व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्याने त्यांच्यावर भ्याड व जीवघेणा हल्ला करून त्यांच्या हाताला कोयत्याने मारहाण केली. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून एका महिला अधिकार्‍यावर फेरीवाल्याने हल्ला केल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी. प्रशासनात आपले कर्तव्य बजावणार्‍या महिला अधिकार्‍यांवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही संताप जनक बाब असून या हल्ल्याचा शिवानंद पांचाळ सह त्यांच्या मित्र मंडळाने जाहीर निषेध करत असून अशा महाराष्ट्रात घटना पुन्हा घडू नयेत म्हणून या हल्लेखोर फेरीवाल्यावर कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी पांचाळ यांनी केली आहे. हि घटना अत्यंत गंभीर आहे.

त्यामुळे देशातील महिला अधिकारी-कर्मचारी व विविध क्षेत्रात देश सेवा करत असलेल्यासह इतर महिलांमध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, जोपर्यंत आशा हल्लेखोरांना कठोर शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहेत,