परळी नगरपरिषदच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना मोहीम शहरात सुरू

28

🔹डेंगूपासून सावधान नागरिकांना आव्हान तर पूर्ण शहरात फवारणी

🔸साथरोग,स्वच्छता,डेंगू या मोहिमे अंतर्गत 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.4सप्टेंबर):- परळी वैजनाथ नगर परिषदच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी डास निर्मुलन मोहीम अंतर्गत डासांचा प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून काही उपाय योजना नगर परिषद मार्फत करण्यात येत आहेत सध्या कोरोना नंतर साथरोग ,डेंगू ,अश्या आजाराने वर तोंड काढले असून नगर परिषदच्या वतीने खबरदारी म्हणून काही उपाय योजना स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत शहराला स्वच्छ ठेवणे व डेंगू आजारापासून नागरिकांनी कोणते उपाय करावे काय काळजी घ्यावी या करिता घरोघरी जाऊन उदा,पाणी टाकी , किंवा पाणी साठवण करण्याच्या सर्व प्रकारच्या जागी अबेटिग टाकण्यात येत आहे.

जेणेकरून त्या पाण्याच्या पृष्ठभागावर डेंगू सारखे मच्छर होऊ नाही म्हणून याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे त्याच प्रमाणे पूर्ण परळी शहरात प्रत्येक घरात जाऊन फवारणी करण्यात येत आहे व रात्रीच्या वेळी शहराच्या मुख्य रस्त्यावर फॉगिंग मशीनद्वारे धूर करून फवारणी करण्यात येत आहे जेणेकरून बाहेर रस्त्यावर सुद्धा स्वच्छ वातावरण राहावे मछर होऊ नाहीत.यापुढे जनजागृती म्हणून शहरात प्रचार करण्यात येत आहे अश्या अनेक नागरिकांच्या आरोग्याचा विषय असल्या कारणाने ही मोहीम नगर परिषद घेत असून या मोहिमे साठी विशेष पथक म्हणून चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून संपूर्ण शहरात ही मोहिम जनजागृती घराघरात पोहचवी असा नगर परिषदचा हेतू असून नगर परिषद मार्फत तर सर्व उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

परंतु नागरिकांना ही आपली कुटूंबाची काळजी म्हणून नगर परिषद द्वारे सांगण्यात अलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपले परळी शहर अश्या आजारापासून दूर राहील अशी दक्षता घ्यावी असे आवाहन नगर परिषदने केले आहे त्याच बरोबर नागरिकांनी आपल्या परीसरात स्वच्छता राखा कचरा नगर परिषदच्या घटा गाडीतच टाका ,पाणी स्वच्छ ठिकाणी साठा करावा, सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष सै. सरोजनीताई सोमनाथ हालगे,गटनेते वाल्मिक आण्णा कराड ,उपनगराध्यक्ष शकील कुरेशी,स्वच्छता सभापती शेख अनवर लाल ,मुख्याधिकारी अरविद मुंडे यांनी केले आहे