अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्यावतीने आशा स्वयंसेविका चा कोरोना योद्धा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

33

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4सप्टेंबर):-येवला शहरातील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील्र ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व अशा गटप्रवर्तक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला स्वतः जीव धोक्यात घालून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना या महामारी मध्ये कोरोना चा फैलाव व संसर्ग वाढू नये म्हणून आशा स्वयंसेविकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी जाऊन कोरोनाला आळा घालण्याचे काम आशा स्वयंसेविका यांनी केल्याने येवला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या वतीने कौतुकाची थाप म्हणून आशा स्वयंसेविका चा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हितेश दाभाडे, बबन कानडे, सुनंदा अवाहाड, निर्मला बुल्हे तसेच तहसीलदार प्रमोद हिले साहेब, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब लोखंडे, दिपक ननावरे हे प्रमुख पाहुणे होते, यांच्यासह ज्याचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान सोहळा आयोजित केला त्या आशास्वयंसेविका सविता अक्कर, निशिगंधा पगारे, वाल्हूबाई जगताप, भारती बनसोडे, सविता अहेर, सुनीता राजगुरू, वंदना गायकवाड, कांताबाई गरुड, रंजना कदम, मनिषा भड, सुनंदा बैरागी, स्वाती चव्हाण, यांच्यासह आदि पदाधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या