महाराष्ट्रातील मुलांचे शाळा त्वरित चालू करा.- रयत शेतकरी संघटना प्रदेश सरचिटणीस. सुनील ठोसर

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

गेवराई₹(दि.9सप्टेंबर):- गेले दोन वर्षापासून कोविड चे कारण देऊन मुलांच्या शाळा बंद केलेले आहेत, शासनाला नवीन पिढी गढवाची आहे का नाही ही शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. अशीच जर शाळा बंद राहिली तर भविष्यामध्ये हीच मुले आमदार-खासदार यांचे गुलाम बन तीन आणि तेच धोरण शासनाचे असलेले दिसून येत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जर मुलांना पाजले नाही तर मुलांचे भवितव्य काय होणार आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रात किती तरी पुढाऱ्यांच्या लाखो लोकांच्या सभा होत आहेत त्या सभेला शासन परमिशन देते आणि मुलांच्या शाळेला का नाही. कोविड चे नाव पुढे करून मोठे षड्यंत्र चाललेले असून त्याच्या नावाखाली येणारी तरुण पिढी बरबाद करण्याचे काम सरकार करत आहे.

दोन वर्षापासून कोविड चे कारण देऊन शाळा कॉलेज बंद केले आहेत. शासनाला नवीन पिढी घडवायचे आहे का नाही असा प्रश्न विधार्थी व पालकांना पडला आहे. अशीच जर शाळा बंद राहीली तर भविष्यामध्ये विधार्थी आडानी राहून निरक्षरता वाढल्याशिवाय राहणार नाही. व शिक्षणाबाबत शासनाचे अडमुठे धोरण दिसून येत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दुध जर मुलांना पाजले नाही तर मुलांच्या भविष्यात काय होणार. महाराष्ट्रात किती तरी पुढाऱ्यांच्या संभा होत आहेत. त्या सभेला शासनाची परवानगी मिळते आणि शाळा चालू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळत नाही. कोविड चे नाव पुढे करून मोठे षडयंत्र करित असून येणारी तरूण पिढी बरबाद करण्याचे काम सरकार करत आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण शाळा व कॉलेज दिवाळीनंतर त्वरित चालू करावेत अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी शासनाला दिला..

व निवेदनात प्रमुख मागण्या

१) सध्याच्या अतिवृष्टी संकटात हेक्टरी २५ हजार मदत करणे

२) अतिवृष्टीमुळे बहुतांश घरांचे पडझड झाली आहे. त्यांना प्रत्येकी २५ हजार मदत करणे

३) मागील वर्षीचा विमा विना अट तात्काळ वाटप करणे

४ ) चालू वर्षांचा विमा विना अट सरसकट लागू करावा

५) अतिवृष्टीत मयत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला तात्काळ २ लाख रुपये मदत करावी

वरील मागण्या सहानुभूतीपुर्वक विचार करून मंजूर करण्यात याव्या अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने १५ दिवसात महाराष्ट्रभर चक्क जाम आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED