कार ऑटो च्या धडकेत चार जखमी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12सप्टेंबर):-पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कार व ऑटो च्या धडकेत चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.11सप्टेंबर रोज शनिवारी शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन गंगाखेड येथे बाजार असल्या मुळे शेतातील भाजीपाला घेऊन ऑटो मध्ये गंगाखेडला येत असताना मालेवाडी व मरडसगाव मध्ये भागी जिनींग जवळ ऐका कारणे कार क्रमांक बीएमडब्लू, (क्र. एमएच18 एयु8288) या कारणे ऑटोस धडक दिल्याने या ऑटोतील शेतकरी संकेत शामराव शिंदे(वय 19)गोपाल बाबुराव शिंदे (वय 30)दत्तराव गंगाराम शिंदे (वय 39)तुकाराम विठ्ठल बडवणे (वय 60)हे गंभीर जखमी झाले.

असून कार चालका यानी पळ काढला असता तेथील ग्रामस्थकांनी त्याचा पाठलाग करून त्यास त्यास पकडून कार चालकासह जखमीना गंगाखेड येथे उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला असून जखमी पैकीं संकेत शिंदे व दत्तराव शिंदे यांना पुढील उपचारासाठी नांदेड व परभणी येथे पाठवण्यात आले आहे असी माहिती उपजिल्हारुग्णालय गंगाखेड प्रशासन यांच्याकडून कळाली असून जखमी कार चालक यास उपचारसाठी हलवण्यात आले असे कळते उशिरा पर्यन्त पोलीस कार्यवाही सुरु होती या घटना स्थळी जखमीना दवाखान्यात पाठवण्यासाठी जी.प. सदस्य प्रल्हाद मुरकुटे व माझी प. स.भास्कर काळे यानी धावपळ केली

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED