अंतकरणाचे औदार्य,सद्गुणांची संपदा बोडखे परिवारातील ‘दत्ताभाऊ’

29

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.14सप्टेंबर):-बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात.अगदी लहानपणापासूनच खोडकर,जिद्दी,आत्मविश्वासू आणि संघटन कौशल्य या मूल्यांवर सातत्याने भर देऊन आगेकूच करणारा अशी प्रतिमा निर्माण केलेले दत्ता बोडखे यांनी युवा अवस्थेतही अगदी त्याच क्रमाने आपली प्रगती करत राहिल्याने समस्त आष्टी तालुक्यातील तमाम नागरिक व युवकांनी त्यांना ‘भाऊ’ ही पदवी दिली आणि दत्ताभाऊ नावाने आज बोडखे परिवारातील अंतकरणात औदार्य आणि सद्गुणांची संपदा लाभलेल्या दत्ता बोडखे यांची प्रतिमा आज अनन्यसाधारण आणि निर्णायक यशस्वी पातळीवर पोहोचलेले आहे.बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील छोट्याशा गावात जरी दत्ताभाऊंचं लहानपण गेलं असलं तरी विचाराची कक्षा रुंदावलेल्या होत्या.

मुळातच आई शिक्षिका आणि वडील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार आणि लेखक असल्याने संस्काराची उधळण आपोआपच घरात झालेली होती.शिक्षणातील गुणवत्ता,त्याच्या जोडीला सामाजिक बांधिलकीची भावना आणि राजकारणातील समाजसेवा या तिन्ही अंगाचा त्रिवेणी संगम असलेल्या दत्ताभाऊ बोडखे यांनी आपल्या प्रेसच्या माध्यमातून युवकांची प्रचंड मोठी फळी तयार केली आणि या संघटन कौशल्याच्या बळाचा नेमका वेध घेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा मार्गदर्शक आदरणीय छगनराव भुजबळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी चालवलेले कार्य प्रशंसनीय आहे.
स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे,ना.छगनराव भुजबळ,माजी मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे,पालकमंत्री धनंजय मुंडे,माजी आ.भीमसेन धोंडे यांची प्रेरणा घेऊन सामान्य जनांची सेवा करण्याचा वसा आणि वारसा दत्ताभाऊंनी घेतला.

गोरगरिबांची सेवा,दीनदलित,दुबळ्या,अनाथ,
दिव्यांग,शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांसाठी आपली फूल ना फुलाची पाकळी देऊन सहभाग नोंदवण्याची सवय आणि स्वभाव हाच आष्टीकरांना आवडतो म्हणून राजकीय,सामाजिक,आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व वैचारिक आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आष्टीतील गुणवंत ठरलेल्या बोडखे प्रेसला आवर्जून भेट देत दत्ताभाऊंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.आई आदर्श शिक्षिका सौ.बबीता आणि वडील वरिष्ठ पत्रकार उत्तमराव यांच्या छायेखाली दत्ताभाऊ योग्य दिशेने जात असल्याचा साक्षात्कार सर्वांना आहे.मोठा भाऊ राकेशभैय्या हे अभियंता झाले असुन सध्या स्पर्धा ( एमपीएससी) परीक्षेची तयारी करीत आहे तर भगिनी डाॕ.शिवानी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.अशा या शिक्षण क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या बोडखे कुटुंबामध्ये दत्ताभाऊ उद्योग क्षेत्रामधून आणि राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामधून आपली वाटचाल सुयोग्य रीतीने करताना बोडखे परिवाराला आनंद होतोय.
आष्टी विधानसभा मतदार संघाचे शिक्षणमहर्षी माजी आ.भीमसेन धोंडे यांचे ते जवळचे नातेवाईक (जावाई) आहेत.समाजकारण,राजकारण त्यांना आवडत असले तरीही आपली क्षमता ते जाणुन आहेत.युवक वर्गात त्यांना पसंदी आहे.प्रामाणिकपणे सर्वत्र मदतीचे काम करीत करीत जायचे.जे प्रारब्धात आहे तेच होत असते या मताचे दत्ताभाऊ आहेत.कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक जेव्हा बोडखे फ्लेक्स ॲन्ड आॕफसेटला भेट देतो किंवा काही छापण्यासाठी येतो तेव्हा एका संस्कारसंपन्न कुटुंबात आल्याचा भास त्याला होतो.ही बोडखे परिवाराची खासियत वरिष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे या पिताश्रींपासून सुरू झाल्याने हा संस्काराचा दुर्लभ वारसा आज समाज माध्यमांमध्ये प्रेरणेचे स्थान म्हणून घेतला जातो.

कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये आणि लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये दत्ताभाऊंनी अनेक गोरगरीब,दीनदलित आणि गरजूंना मदत केली.वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना हजारो रुपयांचे मदत दिली.यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून सामान्य जनांसाठी हातभार लावण्यासह मर्यादित पातळीवर हा वाढदिवस दत्ताभाऊंच्या दिर्घायुष्यासाठी त्याचे प्रियजन करत आहेत.दत्ताभाऊ बोडखे यांचा वाढदिवस हा त्यांच्या मित्रासाठी पर्वणी असला तरी अनेक ज्येष्ठ वरिष्ठ आणि समवयस्क मित्रांसाठी आनंदाचा क्षण आहे.अंतःकरणातील औदार्य आणि सद्गुणांची संपदा लाभलेल्या अशा अष्टपैलू दत्ताभाऊंच्या अभिष्टचिंतनाच्यानिमित्ताने त्यांना दीर्घायुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा…
प्रा.बिभिषण चाटे (सर),पाटोदा