भिसी येथील रोडचे पक्के बांधकाम करावे- महिला मुक्ती मोर्चाची मागणी

39

🔹सवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन सादर

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24सप्टेंबर):-चिमूर – भिसी वार्ड क्र. ३ येथील निरंजना घरडे यांच्या घरासमोरील रोड पूर्णतः मातीचे असून जागोजागी खड्डे पडलेले असल्याने नागरिकाना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पक्के बांधकाम करण्याच्या मागणीसाठी चिमुरचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी भाऊराव राठोड यांना महिला मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष नाजेमा पठाण यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.

रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या मागणीसाठी भिसीवासीय नागरिकांनी महिला मुक्ती मोर्चा यांचेकडे तक्रार अर्ज सादर केले. त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तालुकाध्यक्ष नाजेमा पठाण यांनी भिसी वार्ड क्र. ३ येथील निरंजना घरडे यांच्या घरासमोरील रोडचे पक्के बांधकाम करण्याच्या मागणीसाठी चिमुरचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी भाऊराव राठोड यांचेशी चर्चा करून निवेदन सादर केले.

निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात महिला मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष नाजेमा पठाण, सचिव कल्पना बहादुरे, कोषाध्यक्ष उज्वला खोब्रागडे, सहसचिव आकाश श्रीरामे, सदस्य कोकिळा सूर्यवंशी, भिसी शहर अध्यक्ष निरंजना घरडे, सदस्य इंदिराबाई नागपुरे आदी उपस्थित होते. रोडचे पक्के बांधकाम करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन चिमुरचे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी भाऊराव राठोड यांनी दिले.