सच्चा शिवभक्त

74

शिवभक्त कोण असतो?
अरे शिवभक्त तो असतो,
ज्याच्या हृदयात महारांजाबद्दल
सच्चा आदर असतो
प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणारा
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

कोण म्हणते? राजे,फक्त मराठ्यांचे आहेत
राजे तर सर्वांचेच आहेत.
राजेंसारख जातीभेद ,धर्मभेद,वर्णभेद
कोणताच भेद न करणारा
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

राष्ट्राच्या संरक्षणासाठी भारत-पाक
सीमेवर लढणारे जवान
व राष्ट्राच्या हितासाठी
सतत झिजनारा देशभक्त
म्हणजे सच्चा शिवभक्त होय.

शिवरायांसारखे मातेची सेवा करणारा
आणि आज्ञा पाळणारा
व शंभूराजां सारखं वडिलांचा
आदर- सन्मान करणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

अरे, कपाळावर चंद्रकोर लावून
डोक्यावर फेटा बांधून
चेहऱ्यावर दाढी राखणारा नाही, तर
शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

शिवजयंतीत भगवे कपडे घालून
मिरवनारा नाही तर,
शिवरायांचे आचार, विचार
आचरणात आणणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

परसत्तेसमोर कधीही न झूकणारा
शिवरायांचा मावळा
फक्त महाराजांना व शंभूराजांना
मानाचा मुजरा करणारा
म्हणजेच सच्चा शिवभक्त होय.

✒️कवी:-कु कावेरी दिगांबर जेटेवाड(जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा ता नायगाव जि नांदेड)पिन:-431602(मोबाईल नंबर:- 9503234929,7517906378)