भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चिखली शहरातील नागरिकांसाठी मतदार नोंदणी अभियान

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.5ऑक्टोबर):- येथील स्थानिक छ. शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चिखली शहरातील नागरिकांसाठी मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसातच नगर परिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. ज्या युवक, युवतीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना पहिल्या मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. परंतु मतदार यादीमध्ये जोपर्यंत नाव येणार नाही. तोपर्यंत त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे लोकशाहीतील सर्वात पवित्र असणारे मतदान करण्यासाठी युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या नावाची मतदार नोंदणी करून घ्यावी तसेच मतदारांना नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन आमदार श्र्वेताताई महाले – पाटील यांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात केले.

त्याचप्रमाणे भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य मतदार नोंदणी अभियानात मागील महिन्यात नोंदणी केलेल्या मतदारांना मतदान कार्डचे वाटप करण्यात आले. अनेक युवकांनी स्वईच्छेने भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच “सेवा आणि समर्पण अभियानांतर्गत”आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमानिमित्त भाजपा युवा मोर्चा चिखली शहराच्या वतीने नगरपालिका सफाई कामगारांचे पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड विजयकुमार कोठारी, महाराष्ट्र सहकार फेडरेशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुदर्शनजी भालेराव, ह.भ.प. प्रकाशमहाराज जवंजाळ, राम कृष्णदादा शेटे, प्रताप सिंग राजपूत, जसवंत श्रीवास्तव, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर पुरोहित, तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे, व्यापारी आघाडीचे अशोक शेठ अग्रवाल, सौ कांता देवी गिनोडे भाजपाचे जेष्ठ नेते रामदास देवडे, माजी शहराध्यक्ष सुरेंद्र जी पांडे, कीर्ती सेठ वायकोस, सुधीरजी तांबट, उमेशजी लढा, गोविंद काका गिनोडिया, नारायण भवर, बाळू भाऊ कोठारी, रामभाऊ बोधेकर, गोपालजी पुरोहित, दिलीप शेठ डागा, हनुमंतराव भवर, नगरसेवक राजू गवई, गोविंद देव्हडे, सुभाष अप्पा मंगरूळकर, विजय नकवाल, नामू गुरुदासानी, अनुप महाजन, शैलेश बाहेती, संजय आतार, शेख अनिस, सरचिटणीस महेश लोणकर, सरचिटणीस युवराज भुसारी, संदिप लोखंडे, श्याम वाकतकर, रेणुकादास मुळे, प्रा वीरेंद्र वानखेडे, अमोल ढोरे, सिद्धू ठेंग, नीरज लड्डा, पवनजी लड्डा, छोटू कांबळे, चेतन देशमुख, विजय वाडेकर, दत्ता खंडेलवाल, मंगेश काटकर, संदीप लोखंडे, अनिकेत सावजी, महेश वानेरे, राजू राजपूत, राकेश इगवे, सागर व्यास, आकाश चूनावाले, कल्पक शिरभाते, अक्षय भालेराव, आकाश काळे, उमंग पुरोहित, ऋषिकेश भवर, , शंकर ऊद्रकर उपस्थित होते.