गंगाखेड बंद ला संमिश्र प्रतिसाद

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11ऑक्टोबर):- येथील ऊत्तरप्रदेशातील लखीमपूर शेतकरी हत्त्याकांडाचा गंगाखेड येथे निषेध नोंदवण्यात आला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसालदारांना निवेदन देण्यात आले. आजच्या बदला गंगाखेड शहरात संमीश्र प्रतिसाद मीळाला. निवेदन सादर करेपर्यंत मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.लखीमपूर हत्याकांडातील आरोपीस अटक झाली असली तरी त्यास तातडीने कठोर शिक्षा करावी. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले ऊचलावीत अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भगवती मंदिर येथून पायी जात तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. व्यापारी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार व्यापारी बांधवांनी निवेदन सादर करेपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवले होते.

या बद्दल तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.

निवेदनावर गोविंद यादव, राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष श्रीकांत भोसले, तालुकाध्यक्ष माधव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते,शहरप्रमुख जीतेश गोरे, कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, नगरसेवक ॲड सय्यद अकबर, महिला राज्य सदस्या प्रा. शुभांगी शिसोदिया, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रणीत खजे, मतदार संघ सरचिटणीस सिद्धार्थ भालेराव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, पं. स. सदस्य जानकीराम पवार, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे मराठवाडा ऊपाध्यक्ष मुश्रफ खान, मैनूद्दीन कुरैशी, धोंडीराम जाधव, कुलदिप जाधव, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष शेख ऊस्मान, राष्ट्रवादी युवक चे जिल्हाऊपाध्यक्ष गणेश निरस, भारत जाधव, प्रदीप भोसले, सातपुते सर, नागनाथ निरस, सारंगधर जाधव, गणेश भोसले, गोविॅद जाधव आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते.