वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक विष्णूनगर येथे संपन्न…

28

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

दिघा(दि.15ऑक्टोबर):-वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक ०४ ची महत्तवपूर्ण बैठक वार्ड क्रमांक ०४ येथील जनसंपर्क कार्यालय विष्णु नगर येथे सर्व पदाधिकारी अणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडली, सदर बैठकीमध्ये वार्ड बांधणी अणि येणार्‍या निवडणुकीसाठी कशा प्रकारे नियोजन करून सर्वांनी काम करायचे आहे.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना आपल्या दिघा मधुण वंचित बहुजन आघाडी चा प्रथम नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेत पाठवायचाच अणि परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे एक शासन कर्ता जमात बनवायची याची पूर्ण तयारी आता वार्ड क्रमांक ०४ मधुण श्रद्धेय,बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

जास्तीत जास्त बहुजन बांधवांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील होऊन अणि आपली ताकत निर्माण करावी असे आवाहन नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी नमिता ताई राजेश भालेराव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले. कार्यक्रमास ऐरोली तालुका महासचिव राजेश (दादा)भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गणेश पोटभरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.