जैताने येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला भेट

32

🔸ग्रंथ हेच गुरू – पी. डी. पाटील सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.17″ऑक्टोबर):- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जैताने या गावातील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे यांच्याशी विस्तृत चर्चा झाली, हजारो पुस्तक पाहण्याचा योग आला. वाचनालय भेटीदरम्यान अनेक विद्यार्थी त्या वाचनालयात अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली.

.सदर विद्यार्थी पोलीस भरती, स्पर्धा परीक्षांचा अविरतपणे अभ्यास करीत आहेत. वाचनालयाचा त्यांना अतिशय चांगला फायदा होत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. ग्रंथ हेच गुरु असतात अशी भावना आदर्श शिक्षक पी. डी. पाटील सरांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान अनिल महाजन यांनी मनोहर लिखित “मी सावित्री माझी कर्मकहाणी”, कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? “… हे अनमोल ग्रंथ मान्यवरांना भेट देण्यात आले. याप्रसंगी मांदुर्णे गावातील प्रगतीशील शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील, खान्देश माळी महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश ओंकार महाजन, वंजारी बुद्रुक गावचे सरपंच गणेश महाजन, महात्मा फुले हायस्कूल धरणगाव चे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील सर, आदर्श कन्या विद्यालयाचे उपशिक्षक तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मधुकर सोनवणे आणि संचालक सुनिल मधुकर सोनवणे उपस्थित होते.