कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावित्रीच्या लेकींचा ग्रंथ देऊन सन्मान

33

🔹बुके न देता बुक देणे – सुनिल चौधरी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.17ऑक्टोबर):- प्रपंच निवास येथे कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावित्रीच्या लेकींचा अनमोल ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बुके न देता बुक दिले पाहिजे असे प्रतिपादन कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ.काजल पाटील ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून स्वाती माळी मॅम व कर्तव्य बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका सुरेखा सुनिल चौधरी होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्ती गायत्री लक्ष्मण चौधरी व काजल पंजाबराव चौधरी यांनी संत गोरोबा कुंभार दुर्गा मित्र मंडळ येथे नऊ दिवस एका पेक्षा एक सुंदर अशा रांगोळ्या काढून मंडळाची शोभा वाढवली व सामाजिक संदेश दिला. यानंतर सत्कारमुर्ती कु.श्रद्धा अमित शिंदे ही धरणगाव शहरामध्ये दिंडी चा कार्यक्रम, डान्स स्पर्धा, टीचर्स डे अशा विविध कार्यक्रमात उत्साहाने भाग घेते. अशा तिघही गुणवंत विद्यार्थिनींचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते वर्षा परगट लिखित “मणिकर्णिका “, मिलिंद ढमढेरे लिखित “फुलराणी “, वाय.एन. आंधळे लिखित “फॉर्मल बुक ” असे ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. काजल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे कौतुक केले. शहरात एकमेव मुलां- मुलींना प्रोत्साहन करण्यासाठी नेहमी संस्था अग्रेसर असते. म्हणून सुनीलभाऊ चौधरी यांचे देखील आभार मानते येणाऱ्या काळामध्ये सत्कारमूर्तींना जी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पायल चौधरी हिने केले तर आभार कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनिष चौधरी, प्रकाश महाजन, गौरव चौधरी यांनी परिश्रम घेतले.