डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता राष्ट्र उद्धाराची : डॉ.श्रीपाद जोशी

34

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.18ऑक्टोबर):-मुकनायक,जनता,प्रबुद्ध भारत या मुखपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक,आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक विकास व उत्थानचे पत्रकारिता केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता राष्ट्र उद्धाराची होती.असे मत जेष्ठ साहित्यीक डॉ श्रीपाद जोशी (नागपूर) यांनी मांडले.धर्मांतर घोषणेचा ८६ वा वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ मध्ये आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची प्रसार माध्यमे या विषयावर ते बोलत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रसार माध्यमाची नव्हती तर जनमतपत्र,विचारपत्र,मतपत्र होती.त्यांनी मुकनायक बनून लोक चेतनासाठी त्यांची पत्रकारिता केली.बहिष्कृत भारताला हक्क मिळवून देण्यासाठी,उद्धारासाठी मूकनायक ची निर्मिती केली.बाबासाहेब आंबेडकर विचार इंग्रजी तुन करायचे आणि मराठीतून व्यक्त करत होते.प्रेसफंडाची संकल्पना मांडली,उपेक्षितांच्या राजकारणाचा पाया, मराठी भाषेचा अस्सल तिखटपणा पत्रकारितेत होता.आजची पत्रकारिता मास मीडिया झाली आहे.पत्रकारितेचा धर्म,हेतू,हित पाळला जात नाही फक्त जाहिरात दारांना आकर्षित करण्यासाठी पत्रकारिता उरली आहे असे खेदाने नमूद करावे लागेल. त्यामुळे आपला मेंदू गहाण ठेवणारी पत्रकारिता निर्माण होत असेल तर माध्यम साक्षरतेची गरज आज अधिक निर्माण झाली आहे असे डॉ. जोशी म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक प्रा.अर्जुन कोकाटे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून तिसऱ्या पुष्पाचे उदघाटन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले.कार्यक्रमास युट्यूब तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी यांचे होते..सूत्र संचालन व आभार मिलिंद गुंजाळ यांनी मानले.