✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.25ऑक्टोबर):-ऊसतोड मजुरांच्या हितासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने योजना राबवण्यात येणार आहे. त्यापुर्वी ऊसतोड मजुरांची संख्या किती आहे. याची नोंदणी करण्यात येत आहे.नोंदणी पुर्ण झाल्यानंतर योजना राबवल्या जाणार आहे. आतापर्यंत 21 हजार मजुरांची ऑफलाईन नोंदणी झाली.1 लाख मजुरांचे फॉर्म समाज कल्याण विभागाकडे आले असले तरी त्यात काही त्रुटी आढळून आलेल्या आहे.

संपुर्ण मजुरांची नोंदणी दोन महिन्यापर्यंत पुर्ण होणार असून प्रत्येक कारखान्याकडून मजुरांची माहिती मागवण्यात येणार आहे. त्यासाठी समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजुरांची संख्या आहे. ऊसतोड मजुरांच्या हितासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली.

या महामंडळाच्यावतीने विविध योजना राबवण्यात येणार आहे. त्यापुर्वी राज्यभरात ऊसतोड मजुरांची संख्या किती याची मोजणी करण्यात येणार आहे. नोंदणी करण्याचे काम गावपातळीवर ग्रामसेवकांवर सोपण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत 21 हजार ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली असून 1 लाख फॉर्म समाज कल्याण विभागाकडे आली असली तरी त्यात काही प्रमाणात त्रुटी असल्याचे सांगण्यात येते.

ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. सध्या ऊसतोड मजुर कारखान्याकडे जात आहे.50 टक्यापेक्षा जास्त मजूर कारखान्याला गेले असून कारखान्याकडूनही मजुरांची माहिती मागवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED