अभाविप वरोरा शाखेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

104

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.25ऑक्टोबर):- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमी वेगवेगळे कार्यक्रम , सामाजिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा चे आयोजन करत असते त्यांचाचं एक भाग म्हणून स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट या आयमा अंतर्गत अभाविप वरोरा शाखेने दि. 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन आणि 11 सप्टेंबर म्हणजेच दिग्विजय दिन या दिनाचे औचित्य साधून एका ऑनलाइन तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकूण 62 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. याचं निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि.24/10/2021 रोजी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमांची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक मा.मारोती खिरटकर सर हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ता म्हूणन अभाविप चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविणजी गिलबिले हे उपस्थित होते. तर अभाविप वरोरा शाखेची नगरमंत्री छकुली पोटे आणि स्पर्धा संयोजक लोकेश घाटे हे मंचावर उपस्थित होते. मा.खिरटकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रविणजी यांनी अभाविपच्या निरंतर चालणाऱ्या कार्याविषयी व उपक्रमा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले. या नंतर गणेश नक्षिणे यांनी निबंध स्पर्धेचा निकाल घोषित केला.

त्या नंतर सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक कु. भारती अरविंद सावळे व द्वितीय पारितोषिक कु. युगा भोजराज डोमकावळे आणि कु. कल्पेश आत्माराम पारधी व तृतीय पारितोषिक कु. नंदिनी वसंता बरडे हिनी मिळविलेलं आहे व उर्वरित सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमांचे सूत्र संचालन महाविद्यालय प्रमुख सौरभ साखरकर यांनी केले तर गीत कार्यालयमंत्री अथर्व गवळी यांनी म्हटले व उपस्थित मान्यवारांचा परीचय नगर सहमंत्री लोकेश रुयारकर यांनी केले. व या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोकेश घाटे यांनी केले. आभार नगरमंत्री छकुली पोटे हिने केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गणेश नक्षिणे , शकिल शेख, जयेश भडगरे, सौरभ साखरकर, अथर्व गवळी, आदित्य गारघाटे, नंदनी पोटे आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या वेळी अभाविप कार्यकर्ते, स्पर्धकांचे पालक आदी सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.