मुर्शदपूर – कासारी सरपंचपदी सौ.आदीकाताई लोखंडे यांची बिनविरोध निवड

103

🔹आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपूर चा विकास हेच आमचे ध्येय – सचिन आण्णा लोखंडे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25ऑक्टोबर):-आ.सुरेश आण्णा धस यांच्या ताब्यात असणारी मुर्शदपुर – कासारी – शिदेवाडी सरपंच पदाची निवडणूक आज दि.२५ आँक्टोबर २०२१ रोजी पार पडली.यामध्ये आ.सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक सचिन अण्णा लोखंडे यांच्या मातोश्री सौ.आदीकाताई मधूकर लोखंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.यापूर्वीचे सरपंच संतोष चव्हाण यांच्या सरपंच पदावर अविश्वास ठराव आल्यानंतर अतुल कोठुळे यांची सरपंच पदी निवड करण्यात आली होती.अतुल कोठुळे यांची सरपंचपदी जेंव्हा नियुक्ती झाली होती त्याचवेळी आ.सुरेश आण्णा धस यांनी एक वर्षानंतर सौ.आदीकाताई लोखंडे यांना सरपंच पदाची संधी देण्याचा शब्द दिला होता.

आ.सुरेश आण्णा धस यांचा शब्द हाच शेवटचा शब्द असतो.नेहमीच ते शब्दाचे पालन करतात.त्याप्रमाणे त्यांनी आज आपला दिलेला शब्द पूर्ण केला व सौ.आदीकाताई मधूकर लोखंडे यांची कासारी – मुर्शदपुर – शिदेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी निवड करण्याचे आदेश दिले.या निवडीमुळे सचिन लोखंडे यांच्या मित्रमंडळाने फटाके व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.याप्रसंगी सचिन आण्णा लोखंडे यांनी सांगितले की,आ.सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपूर – कासारी – शिदेवाडी ग्रामपंचायतचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे.