मादळमोहीत तरुणावर जीवघेणा हल्ला; शिष्टमंडळाने घेतली एसपींची भेट

44

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑक्टोबर):-कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी निघालेल्या कृष्णा बबन पायघडे याला अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना मादळमोही येथे घडली आहे.

या प्रकरणी दोषींवर कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली. याबाबत अधिक असेकी, गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील कृष्णा बबन पायघडे हे 23 ऑक्टोबर रोजी कुंभारवाडी येथून मादळमोही येथे सामान खरेदीसाठी गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांना धारदार शस्त्राने मारहाण केली.

या प्राणघातक हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून डोक्याला दहा टाके पडले आहेत. मादळमोही परिसरात सातत्याने गुंडप्रवृत्तीचे लोक विनापरवाना शस्त्र बाळगून सर्वसामान्यांवर हल्ला चढवतात. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या हल्ल्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावे, अशा आशयाची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे भागवत पायघडे, सुभाष कबाडे, कृष्णा जाधव, महादेव जाधव, प्रमोद जाधव, अशोक सरडे, अशोक जाधव यांच्यासह आदींनी केली आहे.