अड्याळ टेकडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27ऑक्टोबर):- आत्मानुसंधान भू -वैकुंठ अड्याळ टेकडी येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची 53 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डाँ. नवलाजी मुळे गुरुजी अध्यक्ष आत्मानुसंधान भू वैकुंठ टेकडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अशोकरावाजी धमाणे दादा तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊरावजी बावणे चंद्रपूर, शंकररावजी दरेकर चंद्रपूर, मुरलीधरजी गोहणे दादा, श्री मारोतीजी साव साहेब चंद्रपूर, रोडे काकू तुकुम चंद्रपूर, आ. मातोश्री अड्याळ टेकडी हे होते.

प्रथम उपस्थित सर्व पाहुण्यांनी अधीष्टानाच पूजन करून दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक च्या माध्यमातून सुश्री गंगाताई यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा व या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी आपले विचार प्रगट केले.त्यानंतर रमेशरावजी गवरी दादा, सौ ललिताताई पोहीनकर, कलावतीताई जांभुळे, वसंताजी कंनाके यांनी आपले मनोगत व विचार मांडले, मंचकावरील सर्व पाहुण्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं.

श्री गोकुलभाऊ पानसे व मंगलाताई पानसे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले गावगणराज्यावर व ग्रामसभेवर गीत सादर केले. जीवन शिक्षण गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.नंतर भाजनाद्वारे गांभीर्य वातावरण तयार करून ठीक 4:58 ला वं. महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व लगेच सामुदायीक प्रार्थनेला सुरवात करण्यात आली. सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर श्री मुरलीधरजी गोहणे दादा यांनी मार्गदर्शन केले.प्रार्थनेनंतर आरती घेऊन प्रसाद वितरण करून शांतीपाठ व जयघोष घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.