डॉ नितीश अग्रवाल यांनी एकाच वेळी केली दोन्ही गुडघा बदलीची यशस्वी शस्त्रक्रिया

52

🔸डॉ हरगुनानी यांच्या मातोश्री वर केली सर्जरी

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.27ऑक्टोबर):-स्थानिक सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ नितीश जगदीश अग्रवाल यांचे अग्रवाल हॉस्पिटल, नांदुरा रोड, खामगांव येथे नुकतेच गुडघा बदलीची जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. नांदुरा येथिल डॉ हरगुनानी यांच्या 70 वर्षीय मातोश्री यांना अनेक वर्षापासून गुडघे दुखीचा त्रास होत होता. हळुहळु तो त्रास त्यांना असहनिय झाला. त्यावर अनेक इलाज करूनही त्यांना चालतांना अत्यंत वेदना होत होत्या. त्रासाला कंटाळुन शेवटी त्यांनी डॉ नितीश अग्रवाल जवळ दोन्ही पायांची संपूर्ण तपासणी केली असता दोन्ही गुडघे बदली शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.

त्यानुसार त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाला शस्त्रक्रियेच्या दुसर्याच दिवशी दोन्ही पायांवर सरळ उभे करण्यात व चालवीण्यात आले. तसेच चवथ्या दिवशी सुखरूप सुट्टी देणयात आली. या शस्त्रक्रिये मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्चप्रतिचे विदेशी सांधे वापरण्यात आले.

खामगाव शहरातच एवढी मोठी यशस्वी शस्त्रक्रिया कमी खर्चात तसेच कमी त्रासात झाल्याबद्दल रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व आनंद व्यक्त करून डॉ नितीश अग्रवाल यांचे आभार मानले.रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा हाच ध्येय ठेऊन डॉ. अग्रवाल हे खामगाव सोबतच प्रत्येक शनिवारी आयकाॅन हॉस्पिटल अकोला येथे सेवा देत आहेत।