रिपब्लिकन पक्षाचा दणका; नेर-नागनाथवाडी रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात :गणेश भोसले

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.28ऑक्टोबर):-खटाव तालुक्यातील नेर ते नागनाथवाडी रस्ता गेल्याच वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आला होता. परंतु या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहनाची ये जा झाल्यामुळे रस्ता पूर्ण खचला होता.या रस्त्यावरून शेकडो वाहने ये-जा करत होती. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे खटाव ता.कार्याध्यक्ष मा.गणेश भोसले यांनी उपअभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,जि. प.सातारा यांना निवेदन देऊन चर्चा केली व या अडचणी सोडवण्याची मागणी केली.

उपअभियंता यांनी शब्द दिला आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.याकामामुळे नेर-नागनाथवाडी या रस्त्यावरून यइ जा करणाऱ्या वाहनांना आता काही अडचण येणार नाही.रस्त्याचे काम चालू झाल्याने नागरिकाच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.हे निवेदन देताना रिपाईचे पदाधिकारी अजित नलावडे, संदीप काळे, महेंद्र माने, सुरज जगताप, प्रफुल्ल जगताप, अजित भोसले उपस्थित होते.