नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटूंबाला बँक मार्फत आर्थिक मदत

27

🔸विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मोटेगाव च्या वतीने मदत

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

नेरी(दि.28ऑक्टोबर):-वरून जवळ असलेल्या महादवाडी येथील रहिवाशी नितेश खोब्रागडे यांचा राहते घरीच नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता मृत्यू पूर्वी त्यांनी प्रधानमंत्री जीवन जोती विमा योजना मोटेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक अंतर्गत काढला होता नितेश यांच्या मृत्यूनंतर कुटूंबियांनी बँकेच्या शाखेत सुरक्षा विमा साठी दावा सादर केला होता तेव्हा दावा मंजूर होऊन बँकेने 2 लाख रुपये नैसर्गिक मृत्यू पावलेल्या आपद्ग्रस्त च्या नितेश खोब्रागडे यांच्या कुटूंबियांना सादर करीत आर्थिक मदत केली.

मागील काही महिन्यांपूर्वी महादवाडी येथील नितेश खोब्रागडे यांच्या नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता त्यांच्या या दुदैवी निधनाने कुटूंबियावर उपासमारीची पाळी आली होती त्यामुळे कुटूंबियांनी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले असता त्यांना बँकेतील सुरक्षा विमा आढळून आला लगेच त्यांनी बँकेला सूचना केली आणि बँकेतील कर्मचारी यांनी सुद्धा मदत करीत दावा सादर करताच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ त्यांच्या कुटुंबातील पत्नीला 2 लाख मंजूर झाला तेव्हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मोटेगाव च्या वतीने 2 लाख रुपये श्रीमती बबिता नितेश खोब्रागडे याना प्रदान करण्यात आला यावेळी मदत देताना शाखेचे व्यवस्थापक कोकोडे साहेब सूर्यवंशी निलेश मसराम विलास रामटेके व परिसरातील गावातील नागरिक उपस्थित होते