मराठा महासंघाच्या “पुढचं पाऊल” पुस्तिकेचं थाटात प्रकाशन

52

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.31ऑक्टोबर):-यापुढील काळात ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास घेऊन समाजाने आपल्या प्रगतीसाठी शिक्षण, उद्योग, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात पाऊल टाकलं पाहिजे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या एक मार्गदर्शक संक्षिप्त पुस्तिका “पुढचं पाऊल” चे प्रकाशन स्थानिक आय. एम. ए. हॉल मध्ये मराठा महासंघ अकोला जिल्हा शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ् डॉ. अभयदादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणुन व्यासपीठावर विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे,मनसेचे पंकज साबळे, जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, विराजमान होते.
मराठा आरक्षणासह समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना, ही चळवळ पुढे नेण्यासाठी समाजा मध्ये अजूनही हवी तेवढी जागृती होत नसल्याची खंत व्यक्त करून डॉ. अभय पाटील यांनी समाजाने काळाची पाऊले ओळखण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. प्रशांत वानखडे यांची अकोला महानगर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी तसेच पंकज साबळे यांची मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा शाखा, शिक्षक आघाडी, तसेच महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक अविनाश पाटील नाकट, संचलन सौ. पूजा काळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद नाकट यांनी केले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. मधुभाऊ जाधव, अविनाश देशमुख, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. श्रीकांत काळे, संजय चौधरी, डॉ. संदीप चव्हाण, सुभाष म्हैसने, मनोज तायडे, संतोष महल्ले, सुनील जानोरकर, ऍड. संतोष गावंडे, संदीप पाटील महल्ले, विजय ठोकळ, दिनकरराव सरप, प्रदीपराव खाडे, योगेश थोरात,शंतनू वसू, गोपाळ राऊत, प्रा. हरिदास ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, निखिल हागे, सौ. कल्पनाताई बिडवे, मंदाताई टेकाडे, शिवा गोंड, विपुल माने, नितीन वाणी, स्वप्नील थोरात, संजय देशमुख, योगेश सुर्वे, प्रदीप लुगडे, प्रतीक खराडे, आदी उपस्थित होते.