अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय महाविद्यालयीन एचआयव्ही/एड्स प्रश्नमजुंषा स्पर्धा संपन्न

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1नोव्हेंबर):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव India@75 या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली कार्यालयामार्फत गडचिरोली येथे रेड रिबन क्लब (RRC) असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स रक्तदान व क्षयरोग या विषयी जनजागृती करीता प्रश्नमंजुषा स्पर्धा शनिवार, दि.30 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सींगस्कुल सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत रेड रिबन क्लब (RRC) असलेल्या महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, केवलरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, महिला महाविद्यालय गडचिरोली, श्री.गोविंदराव मुनघाटे कला व वाणिज्य महाविद्यालय कुरखेडा, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली (संघ) उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम संघ- शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली, द्वितीय संघ- महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी व तृतीय संघ- श्री. गोंविदराव मुनघाटे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुरखेडा क्रमांक मिळविला असून प्रथम क्रमांकास रु.5000/-, द्वितीय क्रमाकांस रु.2000/- व तृतीय क्रमांकास रु. 1000/- तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले व सर्व सहभागी विद्यार्थी यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. दुर्वे बाहयनिवासी वैद्यकीय अधिकारी यांनी केले या प्रसंगी महेश भाडेंकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथक सामान्य रुग्णालय, गडचिरोली अमित दहिवले पाठयनिर्देशक, प्रियंका कोपरकर पाठयनिर्देशक नर्सींगस्कुल सामान्य रुग्णालय, गडचिरोली हेमंत नेलगे, कु. सविता वैद्य, शेषवराव खोब्रागडे, किशोर रामटेके, श्रीकांत मोडक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
***