ग्राम सडक योजना अंतर्गत कामाची फज्जा ठेकेदार मुजोर अधिकारी सेटलमेंट करून कमजोर

25

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.3नोव्हेंबर):-तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामे झपाट्याने सुरू असून कामे अंदाजपत्रका नुसार होत नसल्याने तालुक्यात ओरड सुरू आहे जिवती तालुका आदिवासी भाग असल्यामुळे या भागाकडे शासनस्तरावरून विकास कामाकडे लक्ष वेधले आहे पंतप्रधान ग्रामसडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर योजनेअंतर्गत जिवती तालुक्याचा विकास करण्यासाठी कोट्यवधींची निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजने अंतर्गत झपाट्याने रस्ते, पुल, नाल्या, शासकीय, प्रशासकीय इमारतीच्या कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. कुंभेझरी ते नारायण गुडा ( पळसगुडा) पर्यंत रस्त्याचे, पुलाचे बांधकाम काम सुरू आहे.

या कामात मोठया प्रमाणात निकृष्ट दर्जाचे मटेरिअल वापरण्यात येत असून या कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक परिसरातील नागरिकांनी आरोप केले असून या रस्त्याच्या कामावर रस्त्याच्या साईटचा जेसिपी लावून अवैध रित्या मुरमाचा उत्खनन करून निकृष्ट दर्जाचे मुरमाचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित महसूल विभाग व वन विभागाचे अधिकारी झोपा काढत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? या अवैध उत्खनना कडे कानाडोळा करण्याचा कारण काय असू शकते. संबंधित ठेकेदारावर कारवाई का केली नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. रस्त्याच्या, पुलाच्या कामासाठी समिती नेमून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी मुजोर ठेकेदाराला, कानाडोळा करणाऱ्या संबधित अभियंताला, अवैधरीत्या मुरुमाची उत्खनन करू देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे