सायगाव येथे शेतकऱ्यांचा राजा – बळीराजाला अभिवादन

46

🔹शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटन केले पाहिजे – वक्ते प्रमोद पाटील सर

✒️विशेष प्रतिनिधी(विकास पाटील)

सायगांव(दि.6नोव्हेंबर):- सायगाव ता. चाळीसगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये लोककल्याणकारी राजा, जगाचा पोशिंदा, महात्मा बळीराजास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

या बळीराजा महोत्सवाचे प्रास्ताविक सायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य दिनेश महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच गोकुळ रामराव रोकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मांदुर्णे येथील सुपुत्र आदर्श शिक्षक पी.डी.पाटील, आदर्श शेतकरी दगडू उत्तम पाटील, विकास पाटील, प्राथमिक शिक्षक राजेश पाटील, गोरख पाटील आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सायगाव येथील सर्व ज्येष्ठ मान्यवर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महात्मा बळीराजा व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बळीराजा महोत्सवाचे औचित्य साधून सायगाव येथील आदर्श जेष्ठ शेतकऱ्यांचा टोपी रुमाल देऊन प्रमुख वक्ते पी.डी. पाटील यांच्या हातून हिलाल लुका माळी, एकनाथ कडू महाले, बापु तुळशीराम माळी, कैलास पितांबर आहीरे, सोमनाथ सहादु बागुल या शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते व अतिथी यांचादेखील ज्येष्ठ मंडळींच्या वतीने टोपी व रुमाल देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सायगाव येथील सुरेश माळी यांनी बळीराजा राजा विषयी माहिती सांगुन अभिवादन केले. बळीराजा महोत्सवाचे प्रमुख वक्ते पी.डी.पाटील सर यांनी जगाचा पोशिंदा महात्मा बळीराजा यांचा जीवन परिचय सांगितला. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर या महापुरुषांचा वारसा जपला पाहिजे असे विविध उदाहरण दाखले देऊन महापुरुषांचा इतिहास सांगितला. याचबरोबर शेतकऱ्यांचे संघटन झाले पाहिजे तेव्हाच या प्रशासनाला जाग येईल. आजही घरातील आपल्या माय – माऊली दिवाळी सणामध्ये म्हणतात, इडा पिडा टळू दे !… बळीच राज्य येऊ दे !… असे बळीराजाचे सोन्यासारखे राज्य आज प्रस्थापित झाले पाहिजे अशी अपेक्षा करूया व शेतकऱ्याला न्याय देऊया असे प्रतिपादन प्रमोद पाटील सर यांनी केले.

याप्रसंगी सायगाव येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अर्जुन महाले सर यांनी या कार्यक्रमाची स्थुती केली व वक्ते पी.डी.पाटील यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल व ग्रा.सदस्य दिनेश महाजन यांनी आगळा – वेगळा कार्यक्रम घडवून आणला याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

या बळीराजा महोत्सवाला सायगाव चे उपसरपंच गोकुळ दादा रोकडे, माजी उपसरपंच शंकर अण्णा रोकडे, मा.स.मा.वि. संचालक दादासो अर्जुन देवराम माळी, सोसायटीचे संचालक बापू तुळशीराम माळी, ग्रामपंचायत सदस्य रमेश आनंदा माळी, अण्णा सखाराम रोकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय लक्ष्‍मण माळी, लहानु तुळशीराम सोनवणे, सोमा टेलर, ज्ञानेश्वर बागुल, गोरख पंडित माळी, ज्येष्ठ शेतकरी हिलाल लोका माळी, एकनाथ कडू माळी, कैलास पितांबर माळी, विजय सुखदेव रोकडे, भरत महादू महाले, कैलास पांडुरंग रोकडे, बापु बुधा बागुल व सायगाव येथील समस्त शेतकरी बांधव सर्व समाजातील तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

या बळीराजा महोत्सवाचे सूत्रसंचालन व आभार ग्रा.सदस्य दिनेश महाजन यांनी मानले.