पुसद येथील राज्य परिवहन मंडळ यांच्या आदोलनाला भिम पॅंथर सामाजिक संघटनेचा पाठीबा

30

🔹कामगार कर्मचाऱ्यांचे न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यास कटिबद्ध – भाऊसाहेब जगताप (पाटील) संस्थापक पॅंथर सामाजिक संघटना

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि 8नोव्हेंबर):- येथील राज्य परिवहन मंडळानी विविध मागण्यांच्या संदर्भात दि.४नोव्हेंबर २०२१पासुन सुरु केलेल्या आंदोलनाला भिम पॅंथर सामाजिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब जगताप यांनी भेट देऊन भिमपॅंथर सामाजिक संघटनेचा जाहीर पाठीबा दिला यावेळी कामगार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यास कटिबद्ध राहीलअसे आव्हान भिम पॅंथर सामाजिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब जगताप यांनी आव्हान केले.

सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान महाराष्ट्रातील परिवहन मंडळाच्या सदत्तीस (37) कामगार कर्मचाऱ्यांनीआत्महत्या केलेल्या ह्या सर्व आत्महत्या लॉकडाऊनच्या काळात झाल्या असल्याने शासनाने शासकीय मदत त्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी तसेच राज्य परिवहन मंडळास शासनाने विलीन करून घ्यावे त्या शिवाय कामगाराचे प्रश्न सुटणार नाही असे रोख ठोक प्रतिक्रिया कामगार कर्मचाऱ्यांचे आल्या आहे.