गंगाखेड विधानसभेत विद्युत पुरवठा व्यवस्थित पुरविला जावा – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14नोव्हेंबर):- दिनांक १३ नोव्हेंबर शनिवार रोजी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभेतील विद्युत पुरवठा संदर्भात विद्युत महावितरण च्या महत्वपूर्ण अधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेतली.गंगाखेड, पालम व पूर्णा तिन्ही तालुक्यातील सध्या रब्बी या पिकाचा हंगाम असल्याने सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे.

विद्युत महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्याने आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विद्युत महावितरण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधानसभेतील प्रत्येक गावाच्या विद्युत पुरवठा संदर्भात तालुक्यातील शहरांच्या विद्युत पुरवठा संदर्भात ज्या शेतकऱ्यांना व शहरातील नागरिकांना विद्युत पुरवठा होत नाही अश्या येणाऱ्या अडीअडचणी त्यामध्ये नवीन डीपी मिळणे,विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होणे, गावातील गावठाण डीपी लवकर न मिळणे, व शेतकऱ्यांना डीपी देण्यास होत असलेला विलंब,आणि शहरातील नादुरुस्त डीपी,गावठाण चे डीपी अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी अशा समस्या नागरिकांमधून येत असल्याने बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले विधानसभेत महावितरण विभागाशी निगडित शेतकऱ्यांच्या कृषी पंपा विषयी प्रश्न व ग्राहकांचे प्रलंबित प्रश्न विद्युत पुरवठा विषयी दुरुस्ती असा कोणताही प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा असे आदेश यावेळी दिले.

या वेळी गंगाखेड विद्युत विभागाचे श्री भासारकर साहेब, म्हात्रे साहेब, फड साहेब, कांबळे साहेब,पालम,पूर्णा येथील प्रमुख अधिकाऱ्यांनी येथून पुढे येणाऱ्या अडचणी प्रलंबित राहणार नाहीत याची ग्वाही आमदार साहेबांना दिली.यावेळी जि.प.स.किशनराव भोसले,गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे,तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, नगरसेवक राधाकिसन शिंदे, सरपंच संभूदेव मुंडे,संभाजीमामा पोले,वैजनाथ टोले व पालम पूर्णा तालुक्यातील रासप व गुट्टे काका मित्र मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.