शिवाणीताई वडेट्टीवार यांनी घेतली चिमूर येथे कांग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.18नोव्हेंबर):-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव निवडणुकीकरीता उभ्या असलेल्या शिवाणीताई वडेट्टीवार यांनी चिमूर नगरामध्ये आधार या बंगल्यावर आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला .याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे नेते महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश संघटक (ओबीसी विभाग) धनराजभाऊ मुंगले यांच्या युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण जिल्हारे (सोशल मिडिया सेल चिमूर विधानसभा क्षेत्र),प्रास्ताविक विलास डांगे (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी केले. उपस्थितांचे आभार राजूभाऊ दांडेकर यांनी मानले. या बैठकीला उपस्थित सर्व गजाननभाऊ बुटके (जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर), कु. रीताताई अंबादे (जिल्हा महासचिव युवक काँग्रेस चंद्रपूर), संदीप कावरे (माजी अध्यक्ष युवक काँग्रेस),निखिलभाऊ डोईजड (कार्याध्यक्ष युवक कांग्रेस चिमूर), बंटीभाऊ सहारे शहर अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, शमी शेख, सुभाष पेंदे, आणि चिमूर तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते